
राष्ट्रीय स्तरावरील लेखी परीक्षेत मिळवले यश; ४४ जनांच्या अंकेक्षण समितीत समावेश.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.५/१०/२०२६.
भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय ऑडिट कमिटीच्या आदेशानुसार, बुलढाणा जिल्हा (उत्तर) हिशोब तपासणीस म्हणून तुकाराम रोकडे यांची ऑडिटर (अंकेक्षक) पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 15 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय स्तरावर हिशोब तपासणी व ऑडिटर यांच्याकरिता एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली होते.
या कार्यशाळेनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणी वाणिज्य शाखेतील पदवीधर, उच्च पदवीधर तसेच जीडीसी अँड ए सारखी उच्चव्यवसायिक पात्रता धारण करणाऱ्या देशभरातील गुणवंत पदाधिकाऱ्यामधून 44 लोकांनी अंकेक्षण समितीच्या सदस्यपदी अंकेक्षक (Auditor ) म्हणून निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय ऑडिट कमिटीच्या 30 सप्टेंबर च्या अधिकृत आदेशानुसार, तुकाराम रोकडे यांची भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणा (उत्तर) चे हिशोब तपासणीस नियुक्ती जाहीर झाली आहे. या महत्वपूर्ण आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर. तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड . डॉ. एस. के. भंडारे आणि राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय ऑडिट कमिटी उपप्रमुख ॲड. डॉ. एस . एस वानखडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तुकाराम रोकडे यांच्या या निवडीबद्दल यांचे बुलढाणा जिल्ह्यातील आणि राज्यातील बौद्ध महासभेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, व हितचिंतकाकडून अभिनंदन केले जात असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे…✍️



