खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली; अल्पवयीन मुलगी बेपत्तादेऊळगाव राजात खळबळ; अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेल्याचा संशय

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : शाळेत जाण्यासाठी घरातून निघालेली १४ वर्षे ९ महिन्यांची अल्पवयीन मुलगी शाळेत न जाता बेपत्ता झाल्याची घटना सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी देऊळगाव राजा शहरात घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी देऊळगाव राजा येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. मात्र, ती शाळेत पोहोचली नसल्याचे समोर आले. बराच वेळ उलटूनही मुलगी घरी परतली नाही.
यानंतर कुटुंबीयांनी तिच्या शाळेत तसेच परिसरात आणि नातेवाइकांकडे शोधाशोध सुरू केली.

विविध ठिकाणी चौकशी करूनही मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून सोबत नेले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी तसेच ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नारायण गिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाची जबाबदारी सहायक पोलीस उपनिरीक्षक कुवारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पोलिसांकडून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी विविध शक्यता तपासल्या जात असून, तिच्या शाळेच्या परिसरासह आजूबाजूच्या भागात चौकशी करण्यात येत आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि संबंधितांकडूनही माहिती घेतली जात आहे.
या घटनेमुळे श्रीरामनगर परिसरात खळबळ उडाली असून, मुलीचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने देऊळगाव राजा पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button