खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणाबोदवडमहाराष्ट्ररावेर

बोदवड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा…

रावेर लोकसभा अंतर्गत बोदवड तालुक्यातील हिंगणा, आमदगाव, नाडगाव, जलचक्र, वराड, साळशिंगी, मुक्तळ, शेलवड, रेवती आदी गावांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन आढावा घेतला.

पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, पिकांची झालेली हानी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची यावेळी पाहणी करण्यात आली. स्थानिक भाजपा पदाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांसह शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत पिकांचे नुकसान, पावसाची तूट, शेतीची सद्यस्थिती आणि त्यांच्या विविध अडचणींची माहिती जाणून घेतली.

यावेळी खरीप २०२६ हंगामातील पावसाची तूट व अन्य घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या तालुक्यांमध्ये ‘Trigger-१’ अर्थात ‘पहिली कळ’ लागू करण्यात आली आहे, याबाबत शेतकरी बांधवांना माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी १२ उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाने घेतला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक मदत व दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल, असे सौ. रक्षा खडसे यांनी सांगितले. दुष्काळसदृश परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कष्टावर आपल्या अन्नव्यवस्थेचा आधार आहे. त्यामुळे संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, महसूल अधिकारी तसेच विविध गावांतील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button