बिबट्याने पाडला वासराचा फडशा; ढोरपगाव शिवारातील घटना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:गजानन तांगडे, खामगांव
खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार होत असून गावात दहशत पसरली आहे. गावशिवारात नेहमी दिसणारी माकडे सुध्दा बिबट्याच्या दहशतीने दिसेनासी झाली आहेत अशी माहिती एका ग्रामस्थाने दिली तर गावातीलच कास्तकार शंकर दयाराम तांगडे यांनी गोठयाबाहेर वासरी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी दावणीला बांधली होती. आणि रात्री १० वाजेच्या सुमारास ते शेतात झोपायला आले असता, त्यांना वासरू मृत अवस्थेत दिसुन आले.
सदर वासरू हे ABS संकरीत गाईचे ब्रीड असुन,जवळपास या वासराची किंमत अंदाजे 30ते 40हजार असू शकते असे कास्तकार शंकर तांगडे यांचे म्हणे आहे.हिंस्त्र प्राण्याने वासराचा फडशा पाडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते बिबट्याने केलेल्या शिकारीमुळे गावकरी व जनावरांमध्ये सुध्दा दहशत पसरली आहे. वनविभागाने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त न लावल्यास एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.



