श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलिस दलाचा भव्य रूट मार्च

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विनोद तायडे
रावेर : आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेचे वातावरण राहावे तसेच नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने आज, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता रावेर शहरात पोलिस प्रशासनातर्फे भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
सदर रूट मार्च पोलिस प्रशासनाकडून करण्यात आला. यावेळी मा. श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक (जळगाव), मा. संदिप गावित, अपर पोलिस अधीक्षक (जळगाव), मा. बालनाराव काकडे, SDM फैजपूर व मा. अनिल बडगुजर, उपविभागीय पोलिस अधिकारी (फैजपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रूट मार्चमध्ये स्थानिक गुन्हे शाखा (LCB) जळगावचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह रावेर पोलिस स्टेशनचे दुय्यम अधिकारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, बीडीटीएस आणि एमपीए नाशिकचे अधिकारी सहभागी झाले होते.
मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त व संख्याबळ
रूट मार्चदरम्यान शहरात शिस्तबद्ध व कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये विविध पोलिस ठाणे व दलांचे अंमलदार मोठ्या संख्येने हजर होते.
पोलिस ठाणे अंमलदार : रावेर (५५), यावल (२०), सावदा (१०), निंभोरा (१०), मुक्ताईनगर (१०), स्थानिक गुन्हे शाखा (४०), एसआरपीएफ अमरावती (३३), जळगाव बॉम्ब शोधक व नाशक पथक (०६), पोलिस मुख्यालय व दंगल नियंत्रण पथक (RCP) — RCP क्र. ०७ (१३), RCP क्र. ०४ (१३), RCP क्र. ०२ (१२), RCP क्र. ०३ (१०), स्ट्रायकिंग फोर्स : भुसावळ डिव्हिजन (१५), फैजपूर डिव्हिजन (१५), रेल्वे पोलिस (GRP) : नांदेड (०२), भुसावळ (०१).
गृह रक्षक दल : रावेर, यावल व फैजपूर होमगार्ड युनिटचे एकूण १६० होमगार्ड रूट मार्चकामी उपस्थित होते.
एकूण १३ पोलिस अधिकारी, २४० पोलिस अंमलदार व १६० होमगार्ड यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला.
रावेर शहरातील प्रमुख विसर्जन मार्ग, चौक व संवेदनशील भागातून फिरून हा रूट मार्च दुपारी १२.०० वाजता शांततेत समाप्त झाला.
गणेशोत्सव सण सर्व नागरिकांनी उत्साहात, शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरा करावा; कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा-सुव्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.



