खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

112 वर खोटी माहिती दिल्याचा आरोप; देऊळगाव राजात एकावर गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : 112 या आपत्कालीन क्रमांकावर खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या FIRनुसार, 22 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 9.40 वाजता 112 क्रमांकावर एका व्यक्तीने फोन करून त्र्यंबक नगर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ गणपती मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, घटनास्थळी कॉल करणारी व्यक्ती आढळून आली नाही. पोलिसांनी गणपती मंडळातील नागरिकांकडे चौकशी केली असता अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी फोनवर संपर्क साधला. तो घरी असल्याचे समजल्यानंतर पोलिस त्याच्या घरी गेले. FIRमध्ये नमूद केल्यानुसार, संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांना आढळले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो दारूच्या अंमलाखाली असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे FIRमध्ये नमूद आहे.

या प्रकरणी अभय सुरेशआप्पा ददिहाते (वय 42, रा. गढीजवळ, देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) आणि भारतीय न्याय संहिता कलम 217 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR क्रमांक 0433 असून तो 23 सप्टेंबर 2026 रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भास्कर एकनाथ सानप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button