उस्मानिया पार्कमध्ये साधेपणाने सुन्नत पद्धतीने निकाह

धार्मिक परंपरेनुसार विवाह सोहळा; मोहल्ला कमिटी, हम सब फाउंडेशन व समाजसेवकांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी)
जळगाव शहरातील उस्मानिया पार्क, शिवाजीनगर परिसरात साधेपणा आणि सुन्नत पद्धतीने निकाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धार्मिक परंपरेनुसार साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मरहूम हारून जनाब यांच्या कन्या शेख इंतखाब यांच्या मुलीचा निकाह चाळीसगाव येथून आलेल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राजीखुशीने पार पडला. कोणताही अनावश्यक दिखावा न करता साधेपणाने आणि धार्मिक रितीरिवाजानुसार निकाह अदा करण्यात आला.
या प्रसंगी उस्मानिया पार्क मोहल्ला कमिटी, हम सब फाउंडेशनचे सदस्य, मस्जिद उस्मानियाचे जबाबदार सदस्य, परिसरातील समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात निकाहची रस्म पार पडली.
सामाजिक सलोखा, एकोपा आणि साधेपणाचा संदेश देणाऱ्या या विवाह सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले. परिसरातील विविध सामाजिक घटकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दरम्यान, उस्मानिया पार्क मोहल्ला कमिटीच्या वतीने फारुख भाई कादरी यांनी चाळीसगाव येथून आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले. उपस्थित मान्यवर, समाजसेवक, कमिटीचे सदस्य आणि मस्जिद उस्मानियाच्या सर्व जबाबदार व्यक्तींनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत सुखी वैवाहिक जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या



