माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ

( राजेंद्र मुंडे प्रतिनिधी )
मासरूळ पाडळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनुदानाबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली असता, मुदत संपूनही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे स्वातंत्र्य होय. मासरुळ येथील माजी सरपंच मधुकर शीनकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळी येथे माहितीच्या अधिकारात आरोग्य केंद्रातील विविध योजना, अनुदान, झालेला खर्च यासह इतर काही माहिती मागितली होती.या माहिती अधिकाराचा कालावधी एक महिना असून एक महिना झाल्यानंतर त्यांना माहिती मिळावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळी येथे गेला असता त्यांनी कोणत्याच प्रकारची माहिती मिळाली. नसल्याचे सांगितले. येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना आम्ही ही माहिती तुम्हाला देऊ शकत नसल्याचे लेखी पत्र दिले. माहिती अधिकारांतर्गत सर्वसाधारण प्रकरणांत ३० दिवसात माहिती देणे बंधनकारक



