बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

पूल बांधून द्या, अन्यथा उपोषण

पूल बांधून द्या, अन्यथा उपोषण (बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जी डी रोकडे)राहेरी बु. सिंदखेड राजा तालुक्यातील धानोरा सटवाई येथील शेतकऱ्यांना विपा नदीतून शेतात जाण्यासाठी पूल बांधण्यात यावा व धरणाच्या भिंतीवरील झाडे तोडण्यात यावी यासंदर्भात वारंवार पाटबंधारे विभागाला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूल न झाल्यास उपोषण असल्याचे निवेदन करणारजिल्हाधिकारी यांना ९ डिसेंबरला दिले आहे.मागील अनेक दिवसांपासून विदुपा धरणाचा परिसर धोकादायक परिस्थितीत असल्याचे स्थानिक शेतकरीवर्गाकडून बोलले जात आहे. मागील तीन दशकांपूर्वी झालेल्या विद्वपा धरणासाठी शेतकऱ्यांची खुप मोठी जमीन संपादित केली गेली आहे. मात्र उर्वरित जमिनीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना नदीवर पूल नसल्याने पाण्यातून पलीकडे जाऊन शेती करणे खुप अवघड आहे. तेव्हा भिंतीवरील झाडे तोडण्यात यावीत, या झाडांमुळे शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांची मोठी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button