खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

टूनकी येथील २० वर्षीय युवकाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ: तामगाव पोलिसात मार्ग दाखल.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दी.२०/९/२०२६.

संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथील वीस वर्षीय युवक दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होता. दरम्यान, आज त्याचा मृतदेह पंचाळा शेत शिवारातील एका विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
दीपक संजय झामरे असे या मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक हा 18 सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या दुचाकीने घरातून निघून गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोध मोहीम सुरू केली. अखेर आज पंचाळ येथील शेत शिवारात एका नातेवाईकाला शेताच्या धुर्‍यावर मोटर सायकल उभी असलेली दिसून आली. संशय आल्याने नातेवाईकांनी विहिरीच्या परिसरात पाणी केली असता, तेथे दीपक ची चप्पल आणि मोबाईल आढळून आला. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मृतक दीपक हा शालेय जीवनापासून अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीचा विद्यार्थी होता. मात्र गेल्या काही दिवसापासून तो मानसिक नैराश्यात वावरत होता. अशी बातमी समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच त्यामुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. मृतकाचे नातेवाईक गजानन प्रल्हाद झामरे यांच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी सध्या मर्म दाखल केला आहे.
तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत…..✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button