बुलढाणामहाराष्ट्रराजकीय

चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा ।वंचित बहुजन आघाडी शेगाव यांनी दिले राज्यपालांना निवेदन

चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा ।वंचित बहुजन आघाडी शेगाव यांनी दिले राज्यपालांना निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर श्याम पहुरकर

। महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी संत पिठामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले ,या थोर महापुरुषांबद्दल जे वक्तव्य केले या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कार्यवाही व्हावी यासंदर्भातील निवेदन आज दिनांक 12,12,2022रोजी वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुका, शेगाव शहर, युवक आघाडी शेगाव ,महिला आघाडी शेगाव, यांनी पोलीस स्टेशन शेगाव शहर तसेच तहसीलदार साहेब तहसील कार्यालय शेगाव यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल साहेब यांना पाठवले आहे। सदर वक्तव्य हे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 3(1)V नुसार दखलपात्र गुन्हा असून त्यांनी सदर महापुरुषांनी भिक मागून शाळा बांधल्या असल्याचे वक्तव्य केल्यामुळे हे वक्तव्य हेतुपुरस्पर भिक मागत असे बोलल्याने धार्मिक शब्दांचा अपमान करत भावना दुखावल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 295 ( a )नुसार गुन्हा नोंद व्हावा असे प्रतिपादन सदर निवेदनात केलेले आहे या निवेदनामध्ये दादाराव अंभोरे तालुका अध्यक्ष वंचित आघाडी शेगांव, तसेच संदेश कुमार शेगोकार तालुका युवा अध्यक्ष शेगाव ,शहर उपाध्यक्ष आशिष साहेबराव शेगोकार, सविता गोविंदा जाधव ,सिद्धार्थ मोतीराम सावदेकर ,सागर वाघमारे ,कैलास दाभाडे ,उदयभाऊ सुरवाडे, दीपक इंगळे ,महिला आघाडी अध्यक्ष संगीताबाई ससाने ,आदींच्या सह्या असून निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व महापुरुष प्रेमी उपस्थित होते ।

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button