खानदेशखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा

मुक्ताईनगरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा
मुक्ताईनगर : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियमनाची ड्युटी सुरू असताना रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका वाहनचालकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौक यांच्या पुतळ्याजवळील परिसरात वाहतूक नियमनाची ड्युटी सुरू होती. यावेळी MH-19 CY- 4222 क्रमांकाचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन रस्त्यावर अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की, त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता.
वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहनचालकाची चौकशी केली. त्याने आपले नाव सुरेश नारायण कळम (वय ५२, रा. सुराणा नगर, मुक्ताईनगर) असे सांगितले.
सदर वाहन रस्त्यावर उभे करून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप असून, याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८५ अन्वये मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button