बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अंढेरा पोलीस वसाहतीसाठी निधी द्या

अंकुर देशपांडे व गणेश नागरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोलीस वसाहत उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष अंकुर उल्हासराव देशपांडे व देऊळगाव मही येथील भाजपा युवा नेते गणेश नागरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. गणेश नागरे यांच्या पुढाकाराने हा विषय अंकुर देशपांडे यांच्यासह मुख्यमंत्री स्तरावर मांडण्यात आला आहे.

अंढेरा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते. मात्र, येथे कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज व सुरक्षित शासकीय निवास व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्तव्य बजावताना तसेच कौटुंबिक जीवनातही त्यांना अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अंढेरा पोलीस स्टेशनलगत पोलीस वसाहत बांधण्यासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या जागेवर आधुनिक सुविधांनी युक्त पोलीस वसाहत उभारल्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सोयीस्कर निवास व्यवस्था उपलब्ध होईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांची तत्काळ उपलब्धता वाढून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.

दरम्यान, देशपांडे व नागरे यांच्या निवेदनावर मुख्यमंत्री सचिवालयाकडून संबंधित विभागाला “तपासून नियमानुसार उचित कार्यवाही करावी” असे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयातील खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी पत्रावर सदर निर्देश नोंदविले आहेत. त्यामुळे अंढेरा पोलीस वसाहतीच्या मागणीवर संबंधित विभागाकडून आता कोणती कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.

अंढेरा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न लक्षात घेऊन नवीन पोलीस वसाहतीच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी अंकुर देशपांडे व गणेश नागरे यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button