बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

संत निरंकारी मंडळ चिखली शाखेच्या वतीने रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली- दि . १२
संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन शाखा चिखली च्या वतीने येत्या रविवारी दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत संत निरंकारी सत्संग भवन या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणे मानवतेच्या नात्याने आपले परम कर्तव्य आहे म्हणून रक्तदान शिबिरासाठी आपण स्वतः सहभागी होऊन इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करावे. रक्तदान हे सर्वात महान दान मानले गेले आहे. रक्तप्राप्त करणाऱ्या व्यक्तीलाच त्याचा लाभ होतो असे नाही तर रक्तदान करणाऱ्या लाही अनेक बाबतीत फायदा होतो. रक्तदाना मुळे तुमच्या रक्ताची नियमित तपासणी होते. रक्तदाना मुळे तुम्हाला तुमचा रक्तगट कळू शकतो. रक्तदाना मुळे तुमचे हृदय आरोग्य पूर्ण बनते.संत निरंकारी मिशन ही एक अद्यात्मिक विचारधारा असून या मध्ये रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण,स्वच्छता अभियान या सारखे अनेकानेक उपक्रम राबविले जातात. संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन जगामध्ये जास्तीत जास्त रक्त संकलन करणारे देशातील एक मिशन असून असे जनहितार्थ उपक्रम फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येतात.या भव्य रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. .असे आवाहन संत निरंकारी मंडळ शाखा चिखली च्या वतीने जिल्हा संयोजक शालिकराम चवरे गुरुजी यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button