नांदुरा येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
बुलढाणा प्रतिनिधी- प्रशांत चव्हाण
नांदुरा 🙁 दि. ८ सप्टेंबर) नांदुरा शहरात श्री संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नांदुरा शहराच्या नगराध्यक्ष .सौ
मंगलाताई सुधीर मुऱ्हेकर यांनी पुष्पहार अर्पण करत मनोभावे पूजा केली. यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्ते प्रमोदभाऊ खोंड , विनोद वानखेडे, बंडूभाऊ, किशोर गणगे , व संपूर्ण नाभिक समाज बांधव ,आदी मान्यवर उपस्थित होते .
भाविकांनी संत सेना महाराजांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. भजन, कीर्तन तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्यास समाजबांधव, महिला, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून संत सेना महाराजांनी दिलेला सेवा, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक व समाजबांधवांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.



