बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नम्रता हा ज्ञानप्राप्तीचा सुलभ उपाय. श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

एखादा दुर्धर आजार झाल्यानंतर त्याकडे जर दुर्लक्ष झाले तर, तो आपले प्राण सुद्धा हरण करू शकतो, याचे ज्ञान एखाद्या व्यक्तीला नसणे जेवढे घातक आहे, त्याहूनही अधिक काही न कळण्यापेक्षा आपल्याला काहीच कळत नाही हेही न कळणे अत्यंत घातक आहे. कारण काही कळण्याकरिता आपल्याला काही कळत नाही, हे तरी कळणे गरजेचे असते. कारण हे कळणे सुद्धा काहीतरी कळायला लागले याची सुरुवात असून , एक प्रकारे आपल्या अज्ञानाची स्वीकृती असते. आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे .कारण अज्ञानाच्या स्वीकृती शिवाय अंत:करणात नम्रता निर्माण होत नसून , नम्रते हाच ज्ञानप्राप्ती सुलभ उपाय असल्याचे महत्वपूर्ण मार्गदर्शन श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले. ते आज सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी हनुमान सागराच्या निकट त्रिवेणी संगमावर विराजमान असणाऱ्या श्री हनुमान मंदिर वारी या ठिकाणी महंत कृष्णानंद भारतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दर एकादशीच्या निमित्ताने संपन्न होत असणाऱ्या प्रवचन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तत्त्वज्ञान हे नम्रतेच्या सिंहासनावरच आरुढ होते. ते अहंकाराच्या ओसाड डोंगराची दुर्गम वाट कधीच चढत नाही. परंतु शोकांतिका ही आहे की, आज काहीही न कळणाऱ्यांमध्येच मला भरपूर काही , नव्हे नव्हे सर्वच काही कळते हा भ्रम निर्माण होऊन, विद्वत्तेचा एकही वाण अंगावर न उमटा स्वतःला विद्वान समजणाऱ्या तथाकथित विद्वानांची तसेच स्वयंघोषित शास्त्री पंडितांची संख्या झपाट्याने वाढत असून, हे सामाजिक स्वास्थ्याकरिता बोगस डॉक्टरांपेक्षाही घातक आहे . कारण बोगस डॉक्टर हा एकावेळी एखाद्या रोग्याच्या प्राणघातस कारणीभूत होईल , परंतु अनाधिकाऱ्यांच्या मुखातून झालेले कथाश्रवण हे श्रोत्यांच्या सामूहिक पतनाला कारणीभूत शिवाय राहणार नाही.असा धोक्याचा इशाराही महाराजांनी यावेळी दिल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button