बुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भ

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास; श्रीनिवासभाऊ खेडेकर यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

देऊळगाव राजा येथे मुस्लिम बांधव व महिला भगिनींचा शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा दि. १ सप्टेंबर:स्थानिक देऊळगाव राजा शहरात राजकीय घडामोडींना वेग आला असून, माजी आमदार डॉ. शशिकांतजी खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा आमदार सईद खान साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.

शिवसेनेच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित होऊन मुस्लिम समाजातील बांधवांनी या वेळी पक्षवाढीसाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, परिसरातील महिला भगिनींनी देखील भाग्यश्रीताई श्रीनिवास खेडेकर यांच्या नेतृत्वावर आणि सामाजिक कार्यावर विश्वास दर्शवत मोठ्या संख्येने शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. सर्व नवप्रवेशितांचे पक्षातर्फे गुलाबपुष्प व शिवसेनेचा भगवा दुपट्टा देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले.

अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेनेचे खंदे नेते श्रीनिवासभाऊ खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित सर्व मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी श्रीनिवासभाऊंना पुष्पगुच्छ देऊन दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सोनार साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीभाऊ मापारी, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख सिद्दीक सेठ पैलवान, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, इनायत खान कोटकर साहेब आदी उपस्थित होते. याशिवाय शिवसेनेचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते, मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या पक्षप्रवेशामुळे देऊळगाव राजा शहरात शिवसेनेची ताकद कमालीची वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button