बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने  सेवासंकल्प प्रतिष्ठान व गुरुदेव आश्रमात फळ-फराळ वाटप….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस दै .आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

चिखली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त सेवासंकल्प प्रतिष्ठान व गुरुदेव आश्रम, पळसखेड सपकाळ येथे फळ व फराळ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव पडघान व माजी सभापती ज्ञानेश्वर सुरुषे यांच्या पुढाकारातून तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी आश्रमातील नागरिकांना फळे व फराळाचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपत गरजू व वंचित घटकांसोबत साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला.

कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान भाऊ सुपेकर, तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सभापती विष्णू पाटील कुळसुंदर, युवक तालुकाध्यक्ष अंबादास वाघमारे, खवीस अध्यक्ष ईश्वरराव इंगळे, कार्याध्यक्ष शिवनारायण पाटील, माजी नगरसेवक सचिन बोंद्रे, बिदुसिंग इंगळे, रवी अण्णा काळे, प्रकाश चव्हाण, प्रकाश राठोड, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर भुसारी, प्रदीप कोल्हे, गणेश इंगळे, रामधन मोरे, परमेश्वर कोल्हे, प्रमोद महाले, अर्जुन गवई, संजय सोळंकी, भास्कर चांदोरे, सर्जेराव पडघान, संजय रिंढे, मुकेश भंडारे, शिवदास कापसे, चांगदेव खरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button