बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जेष्ठ गझलकार शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना मानाचा HUM LIT AWARD -2026 पुरस्कार जाहीर ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी -प्रशांत चव्हाण

बुलढाणा -(दि.28 ऑगस्ट) बुलढाणा जिल्ह्याच्या गझल क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे .मोताळा तालुक्यातील पान्हेराखेडी या गावचे भूमिपुत्र ज्येष्ठ गजलकार शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना मानाचा ( HUM LIT AWARD -2026 ) पुरस्कार जाहीर झाला आहे .
बुलढाणा जिल्ह्यासाठी हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे बुलढाणा शहरातील विविध गझल कार्यक्रमांमध्ये शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी उत्कृष्ट निवेदन सुद्धा केले आहे.
HUM FEST या संस्थेच्या वतीने दिला जाणारा HUM LIT AWARD -2026 हा मानाचा पुरस्कार सुरेश भट गजल मंच पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष .शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना जाहीर झाला आहे .उद्या शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी दहा वाजता मुक्ती क्लचरल हब अंधेरी पश्चिम येथे आयोजित भव्य गझल मुशायरा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध गीतकार ,गझलकार ,जावेद अख्तर यांच्या हस्ते देशभरातील दिग्दज मान्यवर गजलगारांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे .
गेल्या सुमारे पंधरा वर्षापासून सुरेश भट गझल मंच या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध ठिकाणी दीडशेहून अधिक( 157 )गझलरंग मुशायऱ्यांचे आयोजन त्याद्वारे (200 )हून अधिक (215 )गझलकारांनी केलेले स्वरचित गझलकारांचे सादरीकरण (7) गझल कार्यशाळा ( 11 )महिला गझलकारांचे मुशायरे (10 )मराठी हिंदी उर्दू मिले जुलै मुशायरे इत्यादी उपक्रमाद्वारे मराठी गजलेच्या प्रचार प्रसारासाठी दिलेल्या योगदानाची उचित दखल घेऊन HUM FEST या संस्थेने केलेला सार्थ गौरव म्हणजे हा पुरस्कार आहे ,
या पुरस्काराचे सर्व श्रेय सुरेश भट गजल मंच चे पदाधिकारी गजल रंग परिवारातील आणि महाराष्ट्रातील तमाम गझलकार आणि गझल रसिक यांचेच आहे त्यामुळे त्यांच्या वतीने केवळ त्यांच्या प्रतिनिधी म्हणून विनम्र कृतज्ञता भावाने हा पुरस्कार स्वीकारणार असल्याचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांनी सांगितले,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button