महाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने संबोधी बुद्ध विहार एकता नगर रिसोड येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजिन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने संबोधी बुद्ध विहार एकता नगर रिसोड येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिग्राम पठाडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, प्रमुख उपस्थित राहुल गवई साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक , प्रमुख मार्गदर्शक प्रा.रंगनाथ धांडे सर.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिला, पुष व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामुहिक त्रिशरण पंचशील घेऊन.. उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. संविधान दिनानिमित्त डॉ.धम्मपाल मोरे वैद्यकीय अधीक्षक यांनी विहारात दहा खुर्च्या दान दिल्या .त्यांचे अभिनंदन भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने केले.
प्राचार्य भास्कर गायकवाड यांनी भारतीय संविधान व इतर देशांच्या संविधान तुलना सांगुन आपले संविधान कसे श्रेष्ठ आहे हे सांगितले.
अॅड.शरद मोरे, अॅड.डि.टी.मोरे, प्रताप मोरे, प्रमिलाताई शेवाळे, संध्याताई पंडित, डॉ.धम्मपाल मोरे, यांनी संविधानाचे महत्व सांगितले. इंदुताई तुरूकमाने,प्रा.रंगनाथ धांडे यांनी संविधान निर्मिती. संविधान वाचविण्यासाठी संघटनेची आवश्यकता, महत्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिग्राम पठाडे यांनी भारतीय संविधान हे बौद्ध धम्माच्या तत्वावर आधारित आहे हे सोदाहरण पटवून सांगितले,.
कार्यक्रमाला उपस्थित भिवाजी खंडारे, भिमराव कळासरे, संगिता तुरेराव , मंदाताई धांडे, महानंदा वाठोरे,रुख्मिना नरवडे,दर्शना जुमडे,मीना चव्हाण,भारत चव्हाण, अशोक पडघान, सचिन नरवाडे अर्जुन डोंगरदिवे,प्रदिप खंडारे, कपिल वाठोरे माजी सैनिक, स्वजला अंभोरे,मंदा पडघान,शिला धांडे,उषा खंडारे,अश्विनी तुरूकमाने,कलावती लेमाडे, सुजाता नरवाडे, दर्शना जुमडे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास सोनुने तालुका सचिव, तर परिश्रम व आभार राहुल जुमडे शहर अध्यक्ष यांनी मानले. कार्यक्रमाला एकता नगर मधील बहुसंख्येने उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होते. शेवटी संविधान उद्देशिकेचे वाचन प्रा.जयवंतराव हेलोडे केले.तसेच ग्राम शाखा नंधाणा येथे सुरू असलेल्या दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये सुद्धा संविधान दिन साजरा करण्यात आला. नंदाताई भगत केंद्रीय शिक्षिका यांनी मार्गदर्शन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button