ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाधान खिरोडकर यांच्या मातोश्री मनकर्णाबाई खिरोडकर यांचे निधन

जळगाव जामोद, दि. १३ ऑगस्ट २०२६ :
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी : मुकिंदा गव्हांदे
तालुक्यातील वडशिंगी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाधान खिरोडकर यांच्या मातोश्री मनकर्णाबाई काशीराम खिरोडकर यांचे वयाच्या ८४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वडशिंगी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मनकर्णाबाई खिरोडकर यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाधान खिरोडकर यांच्या कुटुंबाशी सामाजिक स्तरावर अनेक नागरिकांचे संबंध असल्याने त्यांच्या मातोश्रींच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली. अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत मनकर्णाबाईंना श्रद्धांजली अर्पण केली मनकर्णाबाई काशीराम खिरोडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, हीच प्रार्थना.



