गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

कुख्यात ‘गोल्या’ खाणार जेलची हवा?

फेसबुकवरील बदनामीकारक पोस्ट प्रकरणी तक्रार दाखल; कारवाईची मागणी

फेसबुकवर प्रसारित करण्यात आलेल्या खोट्या, बदनामीकारक व दिशाभूल करणाऱ्या पोस्टप्रकरणी उदयनगर ग्रामपंचायतीचा माजी सरपंच मनोज लाहुडकर उर्फ ‘गोल्या’ यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाणे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे स्वतंत्र लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजपा बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात, तर भाजपा धाड मंडळाचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सादर केली आहे.

तक्रारींमध्ये नमूद केल्यानुसार, संबंधित फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा शासकीय अधिकारी विद्याधर महाले यांच्याबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना खोटे, तथ्यहीन, बदनामीकारक व दिशाभूल करणारे आरोप करण्यात आले आहेत. जाणीवपूर्वक त्यांची सार्वजनिक, सामाजिक व शासकीय प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच या पोस्टमुळे समाजात संभ्रम, गैरसमज व द्वेषाचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांततेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या व्यक्तीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये बरेच गुन्हे दाखल असून, याच्या सार्वजनिक वर्तनापायी याला सरपंच पदावरून निष्कासीत करण्यात आले होते.भ्रष्टाचार, दिरंगाई, मारामारी अशा विविध बाबींसाठी आरोपी असलेल्या या व्यक्तीला तडीपार करण्याची मागणी देखील पोलिसांकडून करण्यात आली होती.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, संबंधित फेसबुक पोस्ट हटविण्यात यावी आणि डिजिटल पुरावे जतन करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

“सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीची विनाकारण बदनामी करणे, खोटी माहिती प्रसारित करणे आणि समाजात द्वेष किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य असून अशा प्रकारांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.”

बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना अनेक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दत्ता पाटील, चंद्रकांत बर्दे, मुन्नाजी बेंडवाल, अॅड. मोहन पवार, अॅड. सुनील देशमुख, नारायणराव हेलगे, सुरेश चौधरी, अंबादास घेवंदे, संजय जुंबड, आनंदा डुकरे, किरण नाईक, मुकुंद देशपांडे, बाळू ठाकरे, मोहम्मद अकील खान, समीर खान, इम्रान हुसैन, उमेश पाटील, कौस्तुभ उमेश पाटील, अभिषेक वायकोस आणि गणेश गवळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button