बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखली नगरपालिकेतील वाढीव कराविरोधात काँग्रेसचा निर्णायक एल्गार; कर रद्द करण्यासाठी विशेष सभेची अधिकृत मागणी

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

चिखलीकरांच्या माथी वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादणाऱ्या नगरपालिकेच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आता निर्णायक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर आता सभागृहातही जनतेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 मधील कलम 81 अंतर्गत विशेष सभा बोलाविण्याची अधिकृत मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे.

वाढीव कराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारा हा वाढीव कर तात्काळ रद्द करून त्यासंदर्भातील ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसने स्पष्ट केले की, जनतेच्या प्रश्नांवर केवळ घोषणा देण्याचे राजकारण न करता कायदेशीर मार्गाने लढा उभारला जात आहे. म्हणूनच नियमानुसार आवश्यक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह विशेष सभेची मागणी सादर करण्यात आली आहे. आता प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने विशेष सभा बोलवावी आणि वाढीव कर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा.

काँग्रेसने इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने किंवा सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला, तर सभागृहापासून रस्त्यापर्यंत तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल. चिखलीकरांवर अन्याय करणारा वाढीव कर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

“जनतेच्या खिशावरचा हा डल्ला आम्ही हाणून पाडल्याशिवाय शांत बसणार नाही,” अशी आक्रमक भूमिका काँग्रेसच्या नगरसेवकांनी व्यक्त केली असून, विशेष सभेत प्रत्येक नगरस जनतेच्या खिशावरचा हा डल्ला आम्ही हाणून पाडल्याशिवाय शांत बसणार नाही,” अशी आक्रमक भूमिका काँग्रेसच्या नगरसेवकांनी व्यक्त केली असून, विशेष सभेत प्रत्येक नगरसेवकाने जनतेच्या बाजूने मतदान करून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चिखलीतील वाढीव कर रद्द होईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button