निःस्वार्थ समाजसेवेचा आदर्श ठरलेले महेशभाऊ महाजन यांना शुभेच्छांचा वर्षाव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : समाजकारणाची खरी ताकद ही पद, प्रतिष्ठा किंवा राजकीय सत्तेत नसून समाजातील सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात असते, याचे जिवंत उदाहरण म्हणून मुक्ताईनगर येथील महेशभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. लोकसेवेलाच ईश्वरसेवा मानून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या महेशभाऊ महाजन यांनी आपल्या कार्यातून मुक्ताईनगर परिसरात एक वेगळी आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे, राजकारणाशी कोणताही थेट संबंध नसतानाही आणि राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगता त्यांनी समाजहिताला प्राधान्य दिले आहे. गरजूंच्या मदतीसाठी तत्पर धावून जाणे, सामाजिक प्रश्नांमध्ये मार्गदर्शन करणे, संकटग्रस्त कुटुंबांना आधार देणे तसेच विविध लोकहिताच्या उपक्रमांना हातभार लावणे या त्यांच्या कार्यशैलीमुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत.
महेशभाऊ महाजन यांची कार्यपद्धती ही प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर आधारित असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. एखाद्याच्या दुःखात खंबीरपणे उभे राहणे आणि आनंदाच्या क्षणी सहभागी होणे, ही त्यांची जपलेली सामाजिक बांधिलकीच त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण मानली जाते. त्यामुळे समाजकारणातील एक संवेदनशील आणि विश्वासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचे संपादक मुख्य संपादक सचिन झनके तसेच दिव्य मातृछाया खानदेश संपादक अतिक खान, पत्रकार विठ्ठल धनगर यांच्या उपस्थितीत महेशभाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आजच्या स्पर्धात्मक आणि स्वार्थप्रधान वातावरणात समाजाशी नाळ जोडून निःस्वार्थ भावनेने कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे दुर्मिळ होत चालली आहेत. अशा परिस्थितीत महेशभाऊ महाजन यांच्यासारखे समाजाभिमुख कार्यकर्ते हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवणारे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



