बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

निकृष्ट रस्ते कामामुळे शेतकऱ्यांचा संताप; सावळ ते धामणगाव मार्गाच्या चौकशीची मागणी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २० जून २०२६
रस्त्यावर टाकलेल्या काळ्या मातीमुळे वाहतूक ठप्प शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी मोठा त्रास संग्रामपूर तालुक्यातील सावळ ते धामणगाव या रस्त्यावरील सुरू असलेल्या कामात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा गंभीर आरोप करत धामणगाव येथील शेतकरी लक्ष्मण सुखदेव वानखडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तक्रारीनुसार, रस्त्याच्या कामादरम्यान नाल्याचे खोदकाम करून त्यातील काळी माती थेट रस्त्यावर टाकण्यात आली आहे. परिणामी संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून वाहनचालकांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच इतर शेतीसाठी लागणारी वाहने या रस्त्यावरून नेणे कठीण बनले आहे. सध्या काही दिवसात पेरणीचा हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केली जात असताना प्रत्यक्षात दर्जेदार काम होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित ठेकेदाराकडून नियमबाह्य पद्धतीने काम होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दर्जेदार साहित्याचा वापर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button