सरसकट कर्जमुक्तीसाठी मेहकरात शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा; अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शासनाला इशारास्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसप्रतिनिधी सलमान पठाण

मेहकर, दि. १९ जून : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी मेहकर येथे शिवसेनेच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले. तर महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे आंदोलनाला विशेष बळ मिळाले.
मोर्चामध्ये जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, जिल्हासंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. हातात फलक, भगवे झेंडे आणि शिवसेनेचे प्रतीक असलेल्या मशाली घेऊन शेतकऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर एचडीओ कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती तातडीने जाहीर करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चामध्ये शेकडो शेतकरी, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.



