जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे तसेच विविध शालेय उपयोगी साहित्याचे वितरण करून आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले.या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण होऊन शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याने शाळा व अंगणवाडी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.कार्यक्रम मुख्याध्यापक विजय दुट्टे, मुक्ताईनगर केंद्राचे केंद्रप्रमुख इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत जिल्हा परिषद शाळांमध्ये अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी मुख्याध्यापक विजय दुट्टे, केंद्रप्रमुख इरफान तडवी, तसेच स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस चे संपादक माननीय श्री सचिन झनके सर शिक्षक सुधाकर सावळे, गंगा वाडेकर, भारती खर्चे, शुभांगी चौधरी, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाला.



