गावकरी ग्रामस्थांच्या संघर्षाला यश, अंत्रीखेडेकर रोहडा रस्त्याचे भुमीपुजन…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी…
चिखली: दि 4/6/2026
*रोहडा तालुक्यातील : रोहडा ते अंत्रीखेडेकर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे सर यांच्या हस्ते आज दिनांक 4 जून रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले. यावेळी सिंदखेड मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेनेचे नेते संतोष भुतेकर, शेतकरी नेते विनायक सरनाईक,शिवाजीराव खेडेकर, तहसीलदार विजय सवडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, बाळू पाटील , आदी मान्यवर उपस्थित होते. रोडाते अंत्रीखेडेकर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. या मागणीसाठी रोहडा व अंत्रीखेडेकर येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले होते
याची गंभीर दखल घेत सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे सर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन उद्याच काम सुरू करतो असे आश्वासन दिले. दिलेल्या आश्वासनाला जागून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला आज दिनांक 4 जून रोजी सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सर्व शेतकरी व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राहुल टाकळकर, संजय खेडेकर, अमोल मोरे, समाधान पेंढारकर, मधुकर शेळके, नारायण चितळे, भीमराव तळेकर, यांच्या सह भिकाजी खेडेकर, सुभाष खेडेकर, नारायण खेडेकर, मिलिंद खेडेकर, बबन खेडेकर, प्रमोद मोरे, वसंतराव खेडेकर, विनायक खेडेकर, पंजाब खेडेकर, इंदुबाई तळेकर, शोभा खरात, सुशीला खरात, मुंजाजी लव्हाळे, सागर खरात, गणेश गुरुकुल , शिवाजी तळेकर आदी उपस्थित होते.



