बुलढाणा

जामोद येथे प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते ‘शौर्य कृषी सेवा केंद्रा’चे थाटात उद्घाटन….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

जळगाव जामोद २१ मे २०२६
स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात शेती साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, जामोद येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘शौर्य कृषी सेवा केंद्रा’ चा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला. स्वराज्य पक्षाचे खंबीर नेतृत्व प्रशांत डिक्कर यांच्या शुभहस्ते या केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले. जामोद येथील प्रयोगशील उद्योजक तेजराव पाटील लोणे यांनी या कृषी केंद्राची निर्मिती केली आहे. शून्यातून आपले विश्व निर्माण करत तेजराव लोणे यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणींना धावून जाण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांबद्दल असलेल्या याच जिवापाड प्रेमातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. याप्रसंगी बोलताना प्रशांत डिक्कर म्हणाले की, “हवामानातील बदल आणि वाढत्या खर्चामुळे आजचा शेतकरी अडचणीत आहे. अशा काळात शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेवर दर्जेदार बियाणे, खते मिळणे गरजेचे आहे. तेजराव लोणे यांनी ‘शौर्य कृषी’च्या माध्यमातून जामोद परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक उत्तम हक्काचे केंद्र सुरू केले आहे, जे कौतुकास्पद आहे.”
या कृषी सेवा केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर आधुनिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या इतरही अनेक अद्ययावत सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी तेजराव लोणे यांच्या या नवीन वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. सखाराम दातीर, विश्वनाथ गायकी, विजय ठाकरे, विशाल चोपडे, मुळे सर अकोली, गणेश मारोडे, सुरेश तोथे, समाधान धुर्डे, शांताराम लोणे, यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button