४० वर्षीयअनोळखी इसमाचा मुत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव ४० वर्षीय
अनोळखी इसमाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना १७ मे रोजी रात्री १० वाजता सुमारास उघडकीस आली असून पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे. शहर पो.स्टे. ला दाखल फिर्यादीनुसार १७ मे रोजी रात्री १० वाजता सुमारास स्टेशन रोडवरील भारत पेट्रोल पंपासमोरील रस्त्याचे फुटपाथचे खाली उपरोक्त अनोळखी इसम पडल्याची माहिती मिळाल्यावरून फिर्यादी सुरेंद्रसिंग चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन अनोळखी इसमास अॅम्ब्युलन्स मध्ये टाकून येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषीत केले. अशा फिर्यादीचे तक्रारीवरून शहर पो.स्टै. ला कलम १९४ जा. फौ. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून
मृतकाचा रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, अंगात ग्रे कलरचे टी शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातलेली आहे मृतकाचे वर्णावरून ओळख पटविण्याचे पोलिस आवाहन
घटनेचा तपास पोहेकॉ सुरेंद्रसिंग चव्हाण हे करित आहेत.



