क्राईमगुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

“प्रेमाच्या आमिषाने अल्पवयीन मुलगी बेपत्ता; मुक्ताईनगरात खळबळ”

मुक्ताईनगरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण; लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल मुक्ताईनगर

:मुक्ताईनगर शहरातील एका भागातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पवन मोहन गोसावी याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपशील:फिर्यादी सौरव संजय वाघ (वय २०, रा. भिलवाडी, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास त्यांची १७ वर्षीय लहान बहीण घरातून बाहेर गेली होती. ती बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. यावेळी फिर्यादीच्या मोठ्या बहिणीला फोनद्वारे माहिती मिळाली की, परिसरातीलच पवन मोहन गोसावी याने पीडित मुलीला आपल्या मोटारसायकलवर बसवून कुठेतरी नेले आहे.कुटुंबीयांनी तात्काळ मुक्ताईनगर शहर, भुसावळ रोड आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र ती कोठेही मिळून आली नाही. संशयित आरोपी पवन गोसावी यानेच लग्नाचे आमिष दाखवून किंवा काहीतरी प्रलोभन देऊन तिला कायदेशीर पालकांच्या रखवालीतून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर सौरव वाघ यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.अल्पवयीन मुलगी असतांना पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल न कारण्यामागचे कारण काय? असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.पोलीस कारवाई:या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पवन मोहन गोसावी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा (रजि. नं. ०१९७/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे करत आहेत. दरम्यान, मुलीला फूस पळून लावणारा हा आमदारांचा कार्यकर्त्यांचा मामेभाऊ असल्याचे तसेच यामुळेच कारवाई होत नसल्याचा समज करून मुलीच्या आई-वडिलांनी आमदारांच्या निवासस्थानासमोर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला याप्रसंगी आमदारांच्या निवासस्थानासमोर असलेल्या काही कार्यकर्त्यांनी तसेच पोलिसांनी समय सूचकता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला आणि यानंतर संबंधितांना पोलिसात नेऊन पुढील उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button