जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

“क्या हुआ तेरा वादा…?” मुक्ताईनगरकरांचा सवाल; आरो पाणी योजना अजूनही रखडली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

“क्या हुआ तेरा वादा…?” मुक्ताईनगरकरांचा सवाल; आरो पाणी योजना अजूनही रखडली

https://www.youtube.com/channel/UCWy_GjqY3wyg37anNOKtfPA

पाईपलाईन टाकली पण नळ कोरडेच; स्वच्छ पाण्यासाठी मुक्ताईनगरकरांची प्रतीक्षा कायम


मुक्ताईनगरकरांचा सवाल : “कधी मिळणार स्वच्छ पिण्याचे पाणी?”

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान नागरिकांना स्वच्छ व शुद्ध आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अनेक नगर सेवक दिले होते. मात्र निवडणूक संपून बराच कालावधी उलटल्यानंतरही शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना अद्याप स्वच्छ पाण्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरो फिल्टर पाणीपुरवठा योजनेसाठी शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले. काही भागांत पाईपलाईन अर्धवट अवस्थेत असून अनेक ठिकाणी खोदकाम करून रस्ते तसेच सोडण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले नसल्याने अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम करणारे मजूर व संबंधित ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरू असून कामाची गती अत्यंत संथ आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.

“आरोचे स्वच्छ पाणी देऊ” असे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता नागरिक थेट प्रश्न विचारत आहेत. पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र नळाच्या तोटीपर्यंत पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे “कधी मिळणार स्वच्छ आरोचे पाणी?” असा प्रश्न सर्वसामान्य मुक्ताईनगरकरांमध्ये उपस्थित होत आहे.

दरम्यान, रखडलेल्या कामांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांवर नियंत्रण ठेवावे आणि नागरिकांना लवकरात लवकर स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button