खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगररावेर

महिलांच्या 33% आरक्षणासाठी ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ विषयक मेळावा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनात सावदा (रावेर) येथे उत्साहात संपन्न…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

दि. 11 एप्रिल 2026 : महिलांना राजकीय व शासकीय क्षेत्रात 33% आरक्षण मिळावे, तसेच संसद व विधानसभेमध्ये महिलांची हिस्सेदारी वाढविण्यासाठी प्रस्तावित नारीशक्ती वंदन अधिनियम या कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आज सावदा (रावेर) येथे महिलांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला.

सदर मेळावा जहरा मॅरेज हॉल येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदरणीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती देत, “नारीशक्ती वंदन अधिनियम” हा महिलांना राजकीय प्रक्रियेत अधिक संधी देणारा ऐतिहासिक निर्णय ठरणार असल्याचे सांगितले.

तसेच महिलांनी पुढाकार घेऊन राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित महिलांनी या कायद्याबाबत आपले विचार, सूचना व मते मांडली. या संवादातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.

या मेळाव्यास सौ.रजनी सावकारे, डॉ.केतकी पाटील, वैशाली दीदी (ब्रम्हाकुमारी), सौ.मंगला पाटील, योगिता पाटील, ॲड.विद्या सोनार, नगराध्यक्ष सौ.संगिता महाजन, नगराध्यक्ष सौ.दामिनी सराफ, नगराध्यक्ष सौ.रेणुका पाटील, सौ.संगिता बियाणी, सौ.शैलेजा नारखेडे, सौ.रंजना भारंबे, माजी जि.प.अध्यक्षा सौ.रंजना पाटील, सौ.गोमती बारेला, सौ.संध्या महाजन, सौ.नजमा तडवी, सौ.रेखा बोंडे, सौ.सविता भालेराव तसेच भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्या व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button