बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
महात्मा फुले शाळेत महिलांनी केले रक्तदान, स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.

प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण
बुलढाणा – येथील महात्मा ज्योतिबा फुले उच्च प्राथमिक शाळेत आज रक्तदान शिबिर घेण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने हे शिबिर डॉक्टर अभिलाष माळी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले होते, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानेरे , सचिव सुरेश चौधरी सुरेश चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी महिलांनी रक्तदान करत आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. वंदना नीलकंठ, प्रीती खंडारे, मनीषा चौधरी यांच्यासह महिलांनी रक्तदान करून सावित्रीबाईंच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला.



