खानदेशगुन्हेगारीनाशिकमहाराष्ट्र

भोंदू रवींद्र एरंडेचा धक्कादायक दावा : ‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’ !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या आडून महिलांची फसवणूक करणाऱ्या रवींद्र एरंडे प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता एरंडेने स्वतःच्या टॅबमध्ये मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडिओ साठवून ठेवल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या माध्यमातून लैंगिक शोषण किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला गेला का, याचा तपास पोलीस करत आहेत.भोंदू अशोक खरातच्या धर्तीवर महिलांना विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या एरंडेचे अनेक काळे कारनामे उघड झाले आहेत. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव तसेच कवड्यांसारखे साहित्य जप्त केले आहे. जादूटोण्याच्या भीतीचा आधार घेत गरजू लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार त्याच्याकडून सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.एरंडेवर लैंगिक अत्याचार आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून सातपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सत्र न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. एरंडेच्या ऑफिस बॉयने त्याच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करत १२ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी एरंडेनेच तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीत त्याने स्वतःकडे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ असल्याचे नमूद केल्याने त्याचे गुपित उघड झाले.तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या डीव्हीडीमध्ये एरंडेचे तब्बल १०० आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आले आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली आहे.दरम्यान, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. एरंडे हा वन्यजीवांचे अवयव आणि जादूटोण्याची भीती दाखवून तसेच नोकरी-व्यवसायाचे आमिष देऊन लोकांचे शोषण करत असल्याचा संशय समितीने व्यक्त केला आहे. तसेच त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.या सर्व घडामोडींमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button