लाच लुचपत विभागाची कारवाई..ग्रामसेवकाला 10 हजाराची लाच घेताना पकडले..

(गावठाण नोंद रद्द करण्यासाठी शेतकऱ्याकडे केली लाचेची मागणी )
जी. डी.
रोकडे . जिल्हा प्रतिनिधी
गारडगाव तालुका खामगाव येथील ग्रा.सेवक विजय गवई यांच्यावर धडक कारवाई. शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांना गले गट्ट पगार असते मात्र अतिरिक्त पैशाच्या हव्यासापोटी ते पकडल्या जातात. असाच एक प्रकार खामगाव तालुक्यातील गाडगाव येथे घडला येथील ग्रामसेवकाला शेतकरी गावठाण जमिनीचा फेर रद्द करण्यासाठी 2 एप्रिल रोजी 10 हजाराचची लाच स्वीकारताना खामगाव पंचायत समिती कार्यालय येथे
बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले गा र डगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक विजय माधव गवई यांनी तक्रारदार शेतकरी यांच्याकडे गावाबाहेर असलेली गावठाण नोंद जागेच्या 8 अ नमुनानोंद रद्द करून सदर नोंदीचे दुरुस्ती अहवाल वरिष्ठांना पाठवण्यासाठी 30 हजाराची मागणी केली होती. तडजोड करून 10 हजारांमध्ये काम करण्याचे ठरविले 2 एप्रिल रोजी पं. समिती खामगाव येथे विजय माधव गवई यांना बुलढाणा एसीबी पथकाने रंगात पकडले. सदर कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक पो. अधीक्षक बापू बांगर, यांच्या पथकाने
कारवाई केली.✒️



