अस्मिता सायकल रेसमध्ये सुवर्णा पाटील यांचा द्वितीय क्रमांक; मुक्ताईनगर पोलीसांचा गौरव

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन
मुक्ताईनगर प्रतिनिधी :
मुक्ताईनगर येथे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून “अस्मिता सायकल रेस” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या सुवर्णा पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
सुवर्णा पाटील यांच्या या यशामुळे मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाच्या कामगिरीत आणखी भर पडली असून, त्यांच्या कर्तृत्वामुळे पोलीस दलाचा सन्मान उंचावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुक्ताईनगर येथील पोलीस निरीक्षक अशोक अडसूळ यांनी सुवर्णा पाटील यांचे अभिनंदन करत शाबासकीची थाप दिली व त्यांचे स्वागत केले.
या स्पर्धेमुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळत असून, पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राबद्दल उत्साह निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.



