“14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; आज 14 मार्चपासूनच तयारीला वेग – गावागावात उत्साहाचे वातावरण”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा १४ मार्च २०२६
भारताचे संविधान शिल्पकार, भारतरत्न ,बोधिसत्व, महामानव B. R. Ambedkar यांच्या जयंतीसाठी The world biggest festival… आता अवघे 30 दिवस शिल्लक राहिले असून. आज 14 मार्चपासूनच 14 एप्रिल म्हणजे सोन्याचा दिवस या दिवसासाठी गावागावात तयारीला वेग आला आहे. युवक मंडळे, सामाजिक संस्था आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमांची आखणी करताना दिसत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गावागावात मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी चालू आहे.
सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीची तयारी, पोस्टर-बॅनर लावणे, सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी सुरू झाली आहे. युवक मंडळे भव्य मिरवणूक, ढोल-ताशे, डीजे आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहेत.करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी साऊंड सिस्टिम, लाईटिंग, बॅनर आणि मिरवणुकीसाठी वाहनांची बुकिंग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. काही गावांमध्ये मंच उभारणी, पुतळ्याची सजावट, तसेच स्वागत कमानी उभारण्याचे काम देखील सुरू झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आणि जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये शिक्षण पूर्ण केले. समाजातील वंचित, दलित आणि गरीब लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.
त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले. शिक्षण, समानता आणि बंधुता या मूल्यांचा प्रचार करून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. त्यांचे काही प्रसिद्ध विचार असे –
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.”
“स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हीच खरी लोकशाहीची तत्त्वे आहेत.”
“मनुष्य महान त्याच्या विचारांनी बनतो.”
या विचारांमुळे समाजातील अनेक लोकांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्याची प्रेरणा घेतली.
जगभरात अनेक गावांमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीची
अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, अभिवादन सभा आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्याचे नियोजनही केले जात आहे. यामुळे समाजात बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
उत्साह वाढत चालला आहे.
जयंतीला अजून 30 दिवस शिल्लक असले तरी गावागावात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 14 एप्रिल रोजी हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कष्ट, त्यांचे विचार आणि समाजासाठी केलेले महान कार्य यामुळे ते आजही करोडो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे….



