बुलढाणामहाराष्ट्र

“माझी गुढी” स्पर्धेचे आयोजन; संस्कृतीचा सन्मान व परंपरा अधिक बळकट व्हावी यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे लोकजागर महिला मंच चे आवाहन .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी अकोला जिल्हा
तेल्हारा : मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आपल्या समृद्ध परंपरेचा सन्मान करण्यासाठी लोकजागर महिला मंच, अकोट–तेल्हारा यांच्या वतीने “माझी गुढी” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडवा सणाचे पारंपरिक महत्त्व जपत महिलांनी आपल्या घरासमोर उभारलेल्या आकर्षक गुढींचे प्रदर्शन या स्पर्धेतून घडवून आणण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या गुढीचा फोटो, नाव, वय, पत्ता व संपर्क क्रमांक mailmelokjagar@gmail.com या ई-मेलवर किंवा 8530311638 या व्हॉट्सॲप क्रमांकावर दि. 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी 3000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 2000 रुपये व तृतीय क्रमांकासाठी 1000 रुपये तसेच स्मृतिचिन्ह व पैठणी देण्यात येणार आहे. याशिवाय पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पेठणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या नियमानुसार गुढी पारंपरिक पद्धतीने उभारलेली असावी, तिची सजावट आकर्षक व स्वच्छ असावी तसेच पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाईल. स्पर्धेसाठी पाठवलेला गुढीचा फोटो किंवा प्रत्यक्ष पाहणी आवश्यक राहणार आहे.
मराठी नववर्षाचे स्वागत करताना आपल्या संस्कृतीचा सन्मान व्हावा आणि महिलांच्या सहभागातून परंपरा अधिक बळकट व्हावी या हेतूने सर्व महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन लोकजागर महिला मंचतर्फे करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button