नाशिक येथे पार पडला, त्यामध्ये ड्रीमलँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रवीण झनके यांना सन्माननीय गौरव करण्यात आला.

दिनांक ५ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2025 या प्रतिष्ठित कार्यक्रमात, जो नाशिक येथे पार पडला, त्यामध्ये ड्रीमलँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना सन्माननीय गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे, फिल्म प्रोड्यूसर सुधीर कुमार पठाडे तसेच शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर (छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते.आजपर्यंत मुक्ताईनगर शहरामध्ये आमच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांची ही दखल आहे. कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाची घरे नागरिकांना कशी उपलब्ध करून देता येतील, यासाठी आम्ही मागील १३ वर्षांपासून सातत्याने काम करत आहोत, आणि त्यात यशस्वीरित्या प्रगतीही साधली आहे. त्या कार्याचीच ही पावती म्हणून आम्हाला हा सन्मान प्राप्त झाला आहे.हा सन्मान मिळाल्यामुळे आमच्यावर आपल्या सर्वांविषयीची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू आणि योग्य सेवा-सुविधा व परवडणाऱ्या दरात दर्जेदार घरे आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत राहू, अशी आम्ही ग्वाही देतो.हे आमचे एकट्याचे यश नसून आपल्या सर्वांचे यश आहे, कारण आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य यामुळेच आम्हाला या क्षेत्रात अग्रेसर राहता आले.आपल्या सर्वांनी आजपर्यंत दाखवलेल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. भविष्यातही असेच प्रेम व सहकार्य मिळत राहील, याची आम्हाला खात्री आहे.पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या विश्वासामुळेच आम्हाला अजून उत्कृष्ट आणि दर्जेदार काम करण्याची प्रेरणा मिळत राहील.



