बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जळगाव जामोद तहसील कार्यालयात विष पिऊन एका व्यक्तीचे आत्महत्या करण्याचा प्रयत्न..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद

तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे वारंवार चकरा मारून खरेदी नक्कल मिळत नसल्यामुळे एका व्यक्तीचे आत्महत्या करण्याचा प्रयत्न धोंडू केडूजी बावस्कार वय वर्ष 67 राहणार दिघी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे 1981 ची खरेदी नक्कल करिता दिनांक 20 /11 /2025 रोजी अर्ज केला होता. परंतु आज रोजी दीड महिना उलटून गेला तरीही तहसील कार्यालय जळगाव जामोद येथून मला नक्कल मिळालेले नाही वारंवार चकरा मारूनही मला उडवा उडवी चे उत्तर देत आहेत. आज देतो उद्या देतो माझी दिशाभूल करत आहेत. सदर नक्कल ही सहा एकराचा पुरावा म्हणून कौशल्याबाई जगदेव सूर्यवंशी यांची खरेदी नक्कल आहे. सदर शेती बाबत तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे गोदावरी बाई जगन्नाथ चांडक हे आणि माझ्यात प्रकरण चालू आहे. सदर नक्कल मिळाल्यास मला न्यायालयाकडून न्याय मिळण्यास मदत होऊ शकते. त्या प्रकरणामुळे तहसील कार्यातील अधिकारी व चांडक या दोघांनी संगणमत करून सदर नक्कल मला मिळाली नाही पाहिजे म्हणून हे सर्व कट कारस्थान रचल्या जात आहे. व तहसील कार्यालयातुन सदर खरेदीनंतर नक्कल संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बाबींमध्ये तहसील कार्यालयातील कर्मचारी सुद्धा सहभागी असून म्हणून मला नक्कल मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. एक भूमिहीन शेतमजूर असून सदर प्रकरण मंजूर करून मला न्याय देण्यात यावा व या विषयाची सखोल चौकशी करण्यात यावी. असे या अर्जामध्ये नमूद केलेले आहे. यांना कोणताही न्याय मिळत नसल्यामुळे आज धोंडू केडुजी बावस्कर वय 67 वर्ष राहणार दिघी नांदुरा जिल्हा बुलढाणा यांनी तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे आपले कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयामध्ये येऊन विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button