जळगावा जिल्हामहाराष्ट्र

मुक्ताईनगरात यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनावट दारूचा महापूर?नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनावर कारवाईचा दबाव

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)

मुक्ताईनगर शहरात सुरू असलेल्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनावट दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून, नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. यात्रा उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल होत असताना काही ठिकाणी अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार सातत्याने होत आहे. काही धाबे, टपऱ्या आणि रस्त्यालगतच्या दुकानांतून बिनधास्तपणे बनावट दारूची विक्री सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेषतः यात्रा काळात मागणी वाढत असल्याने या अवैध व्यवसायाला अधिकच ऊत आला असल्याचे बोलले जात आहे.

शहरालगतच्या पूर्णाड फाटा, संत मुक्ताई चौक परिसर तसेच नॅशनल हायवे आणि भुसावळ रोडवरील काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिसांचे कथित दुर्लक्ष आणि नियंत्रणाचा अभाव यामुळे या प्रकाराला चालना मिळत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बनावट दारूच्या सेवनामुळे विषबाधा, आरोग्य बिघाड किंवा अन्य अनिष्ट घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यात्रा उत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा सोहळा असताना अशा बेकायदेशीर प्रकारामुळे शहराच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिस प्रशासनाने तातडीने संयुक्त कारवाई करून अवैध दारू विक्रीवर आळा घालावा, अशी जोरदार मागणी होत आहे. यात्रा काळात विशेष तपास पथके नेमून धाडसत्र राबवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला असून शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button