बुलढाणामहाराष्ट्र

बुलढाण्यात गुरुवारी ( दि.22 ) पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळावा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण

बुलढाणा: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करियर सेंटर बुलढाणा यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.22 जानेवारी 26 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर रोड बुलढाणा येथे करण्यात आले आहे,
या रोजगार मेळाव्यामध्ये सहयोग को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व दास गॅस इक्कीपमेंट या नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसूचित केलेली आहे, सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनी प्रतिनिधी द्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे, तसेच नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे. दहावी ,बारावी, आयटीआय, पदविका (डिप्लोमा) तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्र व बायोडाटासह प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तरी बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ग . प्र बिटोडे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button