रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा पुर्नाड येथे विशेष जनजागृती उपक्रम“रस्त्यावर शिस्त पाळूया, सुरक्षितपणे शाळेत येऊया!” या

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा पुर्नाड येथे विशेष जनजागृती उपक्रम“रस्त्यावर शिस्त पाळूया, सुरक्षितपणे शाळेत येऊया!” या संदेशासह रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा, पुर्नाड येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबतच्या महत्त्वाच्या सूचना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित, सोप्या व प्रादेशिक भाषेत समजावून सांगण्यात आल्या. लहान वयातच वाहतूक नियमांची जाणीव व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रमुख सूचना :१) पायदळ विद्यार्थ्यांसाठी सूचनारस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.रस्ता ओलांडताना दोन्ही बाजू नीट पाहूनच रस्ता ओलांडावा.चालताना गप्पा मारणे किंवा मोबाईल वापरणे टाळावे.२) सायकल चालवताना घ्यायची काळजीसायकल नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावी.हात सोडून सायकल चालवणे किंवा स्टंट करणे टाळावे.सायकलवर ओझे टाकणे किंवा मागे कोणालाही बसवू नये.३) शालेय बसमधील शिस्तबसमध्ये चढताना व उतरताना घाई करू नये.चालू बसमधून खिडकीबाहेर हात किंवा डोके काढू नये.बस थांबल्यावरच सुरक्षितरीत्या उतरणे आवश्यक आहे.४) पालकांसाठी विद्यार्थ्यांमार्फत संदेशदुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे.मद्यपान करून वाहन चालवणे धोकादायक व गुन्हा आहे.१८ वर्षांखालील मुलांनी वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे.५) आपत्कालीन परिस्थिती – ‘गोल्डन ऑवर’रस्त्यावर अपघात झाल्यास घाबरून पळून न जाता त्वरित शिक्षक, पालक किंवा जवळच्या मोठ्या व्यक्तींना मदतीसाठी कळवावे.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवलाल भोई सर यांनी या सर्व सूचनांची छापील प्रत किंवा फलक तयार करून शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार असल्याचे सांगितले, जेणेकरून विद्यार्थी दररोज त्या वाचून त्यांचे पालन करतील.या उपक्रमास मोटार वाहन निरीक्षक सौरभ पाटील व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रंजीत टिके यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कप



