जळगावा जिल्हामहाराष्ट्र

मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद; 18 वर्षीय तरुणी बेपत्ता

मुक्ताईनगर | प्रतिनिधीमुक्ताईनगर

पोलिस ठाण्यात एका 18 वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली असून, याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सानियाबी नादरशहा फकीर (वय 18 वर्षे 10 महिने, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता ते 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 3 वाजेच्या दरम्यान ही तरुणी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. याबाबत तिचे वडील नजमाबी नादरशहा फकीर (वय 40, व्यवसाय शेती) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.तक्रारदारांनी सांगितले की, त्यांनी नातेवाईकांकडे तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; मात्र सानियाबीचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर पोलिसांकडे धाव घेण्यात आली.तरुणीचे वर्णनबेपत्ता तरुणीची उंची अंदाजे 5 फूट 5 इंच, रंग निमगोरा, अंगावर काळ्या रंगाचा टॉप, गोल्डन रंगाची लेगिंग, खांद्यावर केस, मुलांसारखे बॉयकट केस असून, पायात राखाडी रंगाची चप्पल असल्याचे तक्रारीत नमूद आहे. चेहरा गोल असून, डोळे मोठे असल्याचेही वर्णन देण्यात आले आहे.या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक 02/2026 अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार चंद्रकांत बोडे (बॅज क्र. 2750) करीत आहेत.पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ मुक्ताईनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button