बुलढाणा

उद्या दिनांक 5 तारखेला नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगांव नगर पालिका निवडणुकीचे निकाल लागले असले तरी यावेळी कोणत्याच पक्षाची एकहाती सत्ता आली नसल्याने शेगांव नगर पालिकेच्या दालनात गोंधळाची स्थिती राहणार आहे. कारण यावेळी जनतेने काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पसंती दिली आहे. तर नगरसेवकांच्या बाबतीत भाजपा व महायुतीला पसंती दिली आहे. त्यामुळे यावेळी होणारी निवडणुक ही सर्वच पक्षांना समांतर वागणुक देणारी ठरली आहे, त्यामुळे आता स्थानिक नेतृत्वांना सन्मान दिला असला तरी यावेळी बहुमत नसल्यामुळे नगराध्यक्षासोबत

नगर परिषद उपाध्यक्ष, स्विकृत नगरसेवक आणि समिती सभापती अध्यक्षांच्या रेस मध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तरी यावेळी शेगांव नगर पालिकेत तब्बल 9 वर्षांनंतर ही निवडणुक संपन्न झाली असली तरी ही निवडणुक आजच्या युवा पिढीच्या दृष्टीने प्रतिक्षेची आणि बहुचर्चेची राहीली असली तरी यावेळी बरेच नवे चेहरे यावेळी नगरसेवक म्हणून नगर पालिकेच्या दालनात दिसणार आहेत. तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा सुध्दा नव्यानेच या दालनात येत आहे. त्यामुळे जुन्या जाणत्या सहकाऱ्यांच्या

माध्यमातुन स्विकृत नगरसेवक पदाच्या शर्यतीतही अनेक जण असल्याने यावेळी पक्ष श्रेष्ठी कुणाचा समावेश करणार हा सुध्दा चर्चेचा मुद्दा ठरणार आहे.

तरी याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने पायाभरणी केली आहे. तर त्यांनतर दि. 5 जानेवरी 2026 रोजी नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाल्यानंतर

होणाऱ्या समिती वाटप आणि नगर परिषद उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेक इच्छुक असले तरी यावेळी कुणाला मिळणार न.प. उपाध्यक्षाचा पदभार याकडे शेगांवकरांचे लक्ष लागले आहे. तर नगरसेवकांचे संख्याबळ पाहता समिती सभापतीचा पदभार नेमका मिळणार कुणाला या सगळ्या गोष्टीमुळे राजकारण सुरु झाले असल्याचे चित्र आता पहावयास मिळत आहे. तरी आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. की कुणाला कोणत्या पदाची संधी मिळणार हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होणार असले तरी आता चर्चा मात्र जोमात रंगल्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button