सरपंच यांच्या गैरहजेरीत घेतलीग्रामसभा ग्रामस्थ झाले बेजार सरपंच पतींचा मनमानी कारभार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर शहर प्रतिनिधी विकास आमोदकर
मौजे शिंदखेडा ता रावेर ग्रां. पंचायत कार्यालय तर्फे मुख्यमंत्री समुद्ध पंचायत राज अभियान अतर्गत निवासी कर व अन्य कर थकबाकी यामध्ये 50% ग्रां पंचायत वसुली मध्ये सवलत देण्यात आली असून या करिता चालू वर्षाचा कर पूर्ण भरावा लागणार असून त्या करीता दि :15/12/2025 रोजी ग्रामसभा आयोजित केली गेली होती व ग्रामसभे मध्ये सरपंच / ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित नाही म्हणून ग्रामसभा तहकुब करण्यात आली व पुढची ग्रामसभा दि :17/12/2025 रोजी ग्रा. पंचायत कार्यालय मध्ये होणार असून सदर ग्रामसभेला सरपंच / ग्रामसेवक / व ग्रा पंचायत चे पदाधिकारी नाही यावरूण असे स्पस्ट समजले जात आहे की शिंदखेडा ग्रा पंचायत यांचे ग्रामसभेचे कुठलेही नियोजन न करता व ग्रामसेवक यांना ग्रामसभेची विचारणा न करता व ( हम करे सो कायदा ) असे समजून गावाचा संपूर्ण कारभार हा वाऱ्यावर चालत आहे व सरपंच पती यांना ग्रामस्थ यांनी कोणातेही विचारणा केली असता की उडवा – उडवी चे उत्तरे देत असता त व तसेच शिंदखेडा येथील ग्रामस्थ यांच्या मनामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शिंदखेडा ग्रामपंचायत ला मोठे अपयश आल्याचे चर्चेला उधान आहे



