हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा ; विरोधकांची मागणी

नागपूर । न्युज नेटवर्क
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे. विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केवळ ४ दिवसांचे अधिवेशन व्हायच
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे एकत्रिकरण झाल्यानंतर नागपुरात किमान २ महिन्यांचे अधिवेशन व्हावे असे निश्चित करण्यात आले. आमचे मित्र विरोधी पक्षात असताना एक महिना अधिवेशन चालायचे. पण आज सरकार घाईघाईने पुरवणी मागण्या मांडत आहे. सरकारला एवढी घाई का आहे? असे ते म्हणाले.
वसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनीही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन विदर्भ करारानुसार व्हावे अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यावर तुम्ही निर्णय देणार, हे ठीक आहे. आम्ही तिथे आमचे मत
मांडले होते. तुम्ही आमच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण करू नका, असे भास्कर जाधव म्हणाले.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांच्या मागणीला उत्तर दिले. ते म्हणाले, नाना पटोले यापूर्वी पीठासीन अधिकारी होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण पुरवणी मागण्या सादर करतो, जी विधेयके पारित करायची आहेत त्याची ओळख पहिल्या दिवशी करून दिली जाते हे त्यांना ठावूक असावे. अध्यादेश पहिल्या दिवशी दाखवण्याचा नियम आहे. ३० वर्षांतील अधिवेशनांच्या पहिल्या दिवसाची माहिती काढली तर यापेक्षा वेगळा अजेंडा दिसणार नाही. अधिवेशन अधिकाधिक चालावे अशी आमचीही भावना आहे.
आता आचारसंहिता सुरू आहे. पुढे कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे पहिला आठवा व आणखी 2 दिवस एवढे अधिवेशन चालवण्याचे निश्चित केले. नाना पटोले अध्यक्ष असताना विधिमंडळाची मुंबईतील अधिवेशनेही ५ दिवसांची झाली होती. इतर राज्यांत अधिवेशने सुरुळीत सुरू होती. तिथे कोरोना नव्हता का ? बाकी राज्यांत २० दिवस
अधिवेशने चालायची. पण महाराष्ट्रात केवळ ४ दिवस काम चालायचे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर
विधानसभेच्या तालिका सभापतींची नावे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केली. तालिका सभापतीपदी विधानसभा सदस्य चैनसुख संचेती, किशोरअप्पा पाटील, सरोज अहिरे, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम, समीर कुणावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा सभागृहाने माजी मंत्री, माजी आमदार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मंजूर केला. कै. शिवाजीराव कर्डिले, महादेवराव शिवणकर, भारत बोंद्रे, श्याम अष्टेकर, यशवंत दळवी, नारायण पटेल, सिद्रामप्पा पाटील, गिल्बर्ट मेंडोंसा, राजीव देशमुख आणि निर्मला ठोकळ या लोकप्रतिनिधींनी शिक्षण, सहकार, शेती, क्रीडा, जलसंधारण, उद्योग, आरोग्य, महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे राज्याची तहानी झाल्याचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी नमूद केले.



