बुलढाणामहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नव युवकांना संधी.

आमदार मनोज कायंदे यांच्या निष्ठावंत विश्वासू कार्यकर्त्यांना संधी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी.

प्र. ता. गजानन खिल्लारे. आत्ताच्या काळात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांचा उत्साह ऊर्जा संघटनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देऊळगाव राजा तालुक्यात विविध पदाधिकाऱ्याची आमदार मनोज कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी दीपक चेके, तालुका अध्यक्षपदी शेख नाजिम, तालुका कार्याध्यक्षपदी नारायण मुंडे तर देऊळगाव राजा शहराध्यक्षपदी निलेश गीते नियुक्ती करण्यात आली आहे. युवक हा कोणत्याही निवडणुकीचा निर्णय घटक असल्याने, या नियुक्त्या संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या नव्या नियुक्त्यामध्ये पक्षनिष्ठ, कार्यक्षम विश्वासू आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दीपक चेके यांची सिनखेडराजा विधानसभा मतदारसंघात मनोज कायदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जातीपातीच्या भीती तोडून दीपक शेळके यांनी आपल्या जीवनाचे रान करत आमदार मनोज कायदे यांच्या विजयात दीपक चेके यांचा खारीचा वाटा उचलला होता. त्यांना निष्ठेचे फळ आमदार मनोज कायंदे यांनी दिले असून दीपक चेके यांची विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जाणारे शेख नाजिम हे आमदार मनोज कायदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाची मते आमदार मनोज कायदे यांना मिळवून देण्यास शेख नाझीम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर तालुका कार्याध्यक्षपदी नारायण खेडचे माजी सरपंच नारायण मुंडे. यांची निवड करण्यात आली आहे. नारायण मुंडे यांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आपल्या नारायणखेड गावासह परिसरातील गावांमधून मताधिक्य मिळवून देण्यास यश मिळवले होते. तसेच देऊळगाव राजा शहराध्यक्षपदी निलेश गीते यांची निवड करण्यात आली निलेश गीते गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर देखील त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत राहण्याची पसंत केले. नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकारी हे शिनखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मनोज कायंदे यांचे निष्ठावंत व विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आमदार मनोज कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यकर्ते पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करून युवकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहेत. राष्ट्रवादीचे पक्ष संघटन अधिक सक्षम व गतिमान व्हावे या निर्णयामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील युवकांमध्ये नऊ चैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात राष्ट्रवादी व काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आमदार मनोज कायदे यांनी याप्रसंगी नियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पक्षाच्या धोरणाप्रती निष्ठावान राहून समाजसेवेच्या माध्यमातून युवकांना एकत्र आणण्याचे आव्हान केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या नियुक्त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यात पक्षाला नवी दिशा आणि दमदार ऊर्जा मिळणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button