अंबाजोगाईत ओबीसी-बलुतेदार-अलुतेदार चिंतन परिषद उत्साहात पार

आमदार संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध समाजनेत्यांचा सहभाग
अंबाजोगाई (बीड) –
दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी अंबाजोगाई येथे ओबीसी, बलुतेदार आणि अलुतेदार समाजांच्या एकात्मतेसाठी आणि सामाजिक हक्कांसाठी आयोजित चिंतन परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला आमदार श्री. संजयजी केनेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे आयोजन भीमराव दळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजकिशोर मोदी यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय बलुतेदार विकास परिषद चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व बेलदार समाज प्रदेशाध्यक्ष, समाजसेवक जानकिरामजी पांडे, तसेच शशिकांत आमने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी संत गाडगेबाबा यांचे वंशज प्रविणराव जाणोरकर, तसेच साहितरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वंशज श्री. सचिन साठे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
परिषदेत प्रशांत डोरले, कलीम जहांगीर, भूमन्ना अक्केवाड, बालाजी शिंगे, संजय जोरले, अरुण भालेकर आदींसह विविध ओबीसी आणि बलुतेदार समाजाचे नेते, प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या चिंतन परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीची हाक देण्यात आली. सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रगती आणि आर्थिक सबलीकरण या विषयांवर सखोल चर्चा होऊन भविष्यातील दिशा ठरवण्यात आली.



